भारतीय वंशाच्या मोटेल मालकाचा अमेरिकेत गोळीबारात मृत्यू! आरोपीची आत्महत्या

वॉशिंग्टन- अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका भारतीय वंशाच्या ४६ वर्षीय मोटेल मालकाची एका माथेफिरूने गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून आपले जीवन संपवले. या आरोपीने आत्महत्येपूर्वी स्वतःला एका बंद खोलीत कोंडून घेतले होते. टोरे केल्लम असे या आरोपीचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोटेल मालकाच्या घरात घुसला. त्याने गोळी झाडून मोटेल मालकाला गंभीर जखमी केले. मोटेल मालक बाहेर आल्यानंतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी कार्टेरेट हेल्थ केअर सेंटरमध्ये नेले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याचदरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. यावेळी पोलीस आरोपीला बाहेर येऊन शरण येण्यास सांगत होते, मात्र आरोपी त्यांना नकार देत होता. अखेर पोलिसांचे पथक खोलीत घुसले तोपर्यंत आरोपीने स्वतःला गोळी मारून संपवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top