भारत-अमेरिकेचा‘निसार` बर्फाळ भागांवर लक्ष ठेवणार

न्यूयॉर्क 
भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासाने संयुक्तपणे तयार केलेला ‘निसार` उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला असून लवकरच या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर होणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने इस्रो आणि नासा पृथ्वीवरील ज्वालामुखीतील बदल, जमीन आणि समुद्रावरील बर्फाळ भागांत होणारे बदलासह हिमनद्यांवरील बर्फ वितळण्याबाबत अभ्यास करणार आहेत.  
 नासाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. या निवेदनात नासाने म्हटले आहे की, या उपग्रहामुळे अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडच्या हिमनद्यांमध्ये लहान प्रक्रियेमुळे मोठे बदल कसे होतात. हे वैज्ञानिकांना कळणार आहे.या उपग्रहाच्या साहाय्याने भूस्खलनग्रस्त भागांचे शेतीचे मॅपिंग करता येणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवरील बर्फाळ क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध होईल.  
हिमनद्यांचा अभ्यास करणारे नासाचे शास्त्रज्ञ ॲलेक्स गार्डनर यांनी सांगितले की, आपल्या पृथ्वीवरील बर्फ वेगाने वितळत आहे आणि आपल्याला त्याची वितळण्याची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये उपग्रह मदत करेल.  हा उपग्रह यावर्षी लॉन्च होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. हा उपग्रह दर 12 दिवसांनी दोनदा संपूर्ण पृथ्वीची जमीन आणि बर्फाच्या क्षेत्राचे सर्वेक्षण करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top