भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुजबळांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ भुजबळांच्या लोकसभेच्या प्रचाराचा ट्रेलर असल्याचे समर्थकांनी सांगितले. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमधून उमेदवारीची मागणी केली होती. त्यातच आता भुजबळांनीसुध्दा नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे अनेक नेतेही नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा आणखी वाढण्याची शक्यात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top