भोर तालुक्यातील ‘कुसगाव बोगदा’ यावर्षी डिसेंबरपासून खुला होणार

पुणे- भोर तालुक्यातील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर असलेल्या कुसगावजवळ ‘मिसिंग लिंक’ म्हणजेच नवीन मार्गिकेच्या वाहतुकीसाठी असलेला बोगदा यंदाच्या डिसेंबर महिन्यापासून खुला करण्यात येणार आहे.सध्या या ‘मिसिंग लिंक’ चे काम सुमारे ८५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.कुसगाव बोगद्यामुळे पुणे आणि मुंबई या शहराचे अंतर तेरा किलोमीटरने कमी होणार आहे.

‘एमएसआरडीसी’ने अपघात रोखण्यासाठी तसेच प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी खोपोली कुसगावदरम्यान नवीन मार्गिका म्हणजेच मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. या १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेच्या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे.’मिसिंग लिंक प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर १८० मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आणि सर्वांत जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top