मतदान बॅलेट पेपरवर नाही इव्हीएम मशीनवरच होणार

*सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली

व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) स्लिपसह ईव्हीएमवर केलेल्या प्रत्येक मताची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाने आपले मत स्पष्ट केले. निवडणुका यापुढे बॅलेट पेपरवर होणार नाहीत, त्या इव्हीएम मशीनवरच होतील, असे स्पष्टीकरण न्यायालयाने दिले. इव्हीएम मशीनमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष देता येईल, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीवेळी नोंदवले आणि अंतिम निर्णय राखून ठेवला .

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने १८ एप्रिल रोजी व्होटर व्हेरिफायेबल व्हीव्हीपीएटी सह ईव्हीएम वापरून टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करावी ही मागणी करणाऱ्या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता. आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की राजकीय पक्षांच्या चिन्हासोबत छेडछाड झाल्याची कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही. मतांमध्ये काही गोंधळ झाल्याचा एकही पुरावा दिलेला नाही . केवळ संशयावरून निर्णय होऊ शकत नाही .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top