मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या कोणताही ब्लॉक नसेल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी ११.३० ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल गाड्या मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर उद्या सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top