मध्य प्रदेशात स्टेज कोसळले मुख्यमंत्री थोडक्यात बचावले

भोपाळ – लोकसभा निवडणुकीसाठी सध्या देशभरात उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. मध्य प्रदेशमधील एका प्रचारसभेत मुख्यमंत्री मोहन यादव हे भाषण करण्यासाठी स्टेजवर आले. मात्र, गर्दीमुळे अचानक स्टेज कोसळले. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तत्काळ स्टेजवरून खाली उतरवले. यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव थोडक्यात बचावले.

मध्य प्रदेशातील टीकमगड लोकसभा मतदारसंघातील छत्रसाल परिसरात भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री विरेंद्र सिंह यांची प्रचार सभा होती. सभेसाठी तात्पुरते स्टेज उभारले होते.विरेंद्र सिंह हे भाषण करत असताना अनेकजण स्टेजवर चढले होते. त्यातच मुख्यमंत्री मोहन यादव हे भाषण करण्यासाठी स्टेजवर आले.त्याचवेळी अचानक स्टेज कोसळले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याऱ्यांनी स्टेजवर पोहोचून त्यांना स्टेजवरून खाली आणले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top