मध्य रेल्वेवर आसनगाव येथे वंदे भारतचे इंजिन बिघडले

कसारा –

वंदे भारत एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये आटगाव ते कसारा दरम्यान बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी सुमारास ही घटना घडली. वंदे भारत एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने अनेक ट्रेन ट्रॅकवर अडकून पडल्या होत्या. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारतच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. लोकल ट्रेन २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. इंजिनमधील बिघाड दुरुस्थ केल्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली. मात्र प्रवाशांचे हाल झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top