मनोज तिवारी विरोधात कॉंग्रेसतर्फे कन्हैया कुमार

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी आपल्या १० उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. ज्यामध्ये कन्हैया कुमारसह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमार बिहार राज्यातून लोकसभा निवडणूक लढले होते. मात्र, यावेळी काँग्रेसने त्यांना थेट राजधानी दिल्लीतून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे.कन्हैया कुमार यांचा ईशान्य दिल्लीतून भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याशी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कन्हैया कुमार यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसने चांदनी चौकातून जे.पी.अग्रवाल तर उदित राज यांना ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.त्याचप्रमाणे पक्षाने पटियालामधून धर्मवीर गांधी आणि जालंधरमधून चरणजीत सिंह चन्नी यांना तिकीट दिले आहे.काँग्रेसने पंजाबमधील अमृतसरमधून गुरजीत सिंग औजला येथून तर फतेहगढ साहिबमधून अमर सिंग,भटिंडामधून जीत मोहिंदर सिंग सिद्धू आणि संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा यांना तिकीट दिले आहे. कॉंग्रेसने उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या जागेवर उज्ज्वल रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top