मराठा आरक्षणासाठी आणखी दोन तरुणांची आत्महत्या

संगमनेर- मराठा आरक्षणासाठी आणखी संगमनेर आणि छत्रपती संभाजीनगर येथे दोन तरूणांनी आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यात एका तरूणाने आपल्या घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सागर वाळे (२५) असे या तरूणाचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ‘आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा’, आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असे सागरने मृत्यूपूर्व पत्रात लिहिले आहे.

आत्महत्येची दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथील पोखरी गावात घडली. शुभम अशोक गाडेकर(२३) असे या तरुणाचे नाव आहे. तो कोलठान येथील रहिवासी होता. त्याने पोखरी शिवारात झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तो एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या पश्चात मोठा भाऊ, आई-वडील असे कुटुंब आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top