मराठ्यांचा घोड्यावरून साखर वाटप करत जल्लोष!

सातारा- सरकारने आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यामुळे सातारा शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या किडगाव परिसरात मराठा बांधवांनी दुचाकीवरून मशाल फेरी काढली.तसेच परिसरातील गावागावात घोड्यावरून साखर वाटप करत जल्लोष केला.
हा आनंदोत्सव साजरा करताना सुरुवातीला मराठा तरुणांनी किडगाव येथील ग्रामदेवतेला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर गावोगावी घोड्यावरून जाऊन लोकांना साखर वाटप केले.यावेळी दुचाकीवरून मशाल फेरी काढण्यात आली.यामध्ये ५० दुचाकींचा समावेश होता. कार्यकर्ते यावेळी एक मराठा,लाख मराठा अशा घोषणा देत होते. या मशाल फेरीमध्ये अनेक गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top