मशाल घरा घरात पोहोचवण्याचा ठाकरे गटाचा आक्रमक प्रयत्न…

मुंबई- शिवसेना पक्षात झालेल्या फुटी नंतर पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. पक्षफुटीनंतर मिळालेले मशाल चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून आक्रमक पणे केला जात आहे, त्या साठी ठाकरे गटाच्या शाखाशाखानमधून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोहिमा आखण्यात आल्या आहेत. .शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गर्जू दे… विशाल; दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे, हे शिवसेनेचे मशाल गीत प्रत्येक शाखाप्रमुख आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या मोबाईल वर रिंग टोन म्हणून ठेवण्यात आले आहे. .प्रत्येक शाखेत, त्या भागातल्या मतदारांची यादी देण्यात आली आहे, या मतदारांना वयक्तिक भेटून मशाल चिन्हबाबत माहिती द्यायची आहे, मतदानाची तारीख जवळ आल्यावर मशाल रॅली काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोहिमेवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत, सतत आढावा घेऊन ते मतदारनपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी नव्या योजना सांगत आहेत. ..शिवसेनेची मशाल या गीताच्या ओळींमधून विरोधकांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
बोरिवली, दहिसर चे विभागप्रमुख उदेश पाटेकर म्हणाले कि ‘एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळाली आणि उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला दुसरी निशाणी शोधणे क्रमप्राप्त झाले. अनेक विचारांती मशाल हे चिन्ह नक्की करण्यात आले आणि ते मिळालेही. ज्यादिवशी हे चिन्ह मिळाल्याची बातमी आली त्याच दिवशी महाराष्ट्रातील कोट्यावधी शिवसैनिकांनी मशाल आपल्या स्टेटसवर ठेवून लढाईचे रणशिंग फुंकले. खरे पहाता या मशालीनेच शिवसैनिकांच्या मनातील अंगार फुलवला आणि धग जागी ठेवली. त्या मुळे चिन्ह घराघरात पोहोचले आहे,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top