मस्क यांचे ४६५ कोटींचे पॅकेज न्यायालयाकडून रद्द

न्यूयॉर्क

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांचे ४६५ कोटी रुपयांचे पॅकेज न्यायालयाने रद्द केले आहे. डेलावेअर कोर्ट ऑफ चॅन्सरीच्या न्यायाधीशांनी मस्क यांचे पॅकेज करार रद्द केले. या निर्णयावेळी न्यायाधिशांनी सांगितले की, मस्क यांना आतापर्यंत मिळालेला अतिरिक्त पगार ते कसा परत करतील याचा निर्णय पूर्णपणे कंपनीचा असेल.

न्यायाधीशांनी सांगितले की, मस्क यांना सार्वजनिक बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज मिळत आहे. ही ‘अपार रक्कम’ आहे. कंपनीने मस्क यांना ही रक्कम देण्यापूर्वी विचार केला नाही. मात्र, मस्क यांच्या पॅकेज मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत मोठ्या त्रुटी असल्याचे समजले. त्यामुळे मस्क यांना आतापर्यंत मिळालेला अतिरिक्त पगार ते कसा परत करतील याचा निर्णय पूर्णपणे कंपनीचा असेल.

भागधारकाने २०१८ मध्ये तक्रार केली होती. ५ वर्षांपूर्वी काही भागधारकांनी मस्क आणि टेस्लाच्या बोर्डावर कॉर्पोरेट मालमत्ता वाया घालवल्याचा आणि एलन मस्क यांना बेकायदेशीरपणे श्रीमंत बनवल्याचा आरोप केला होता. मस्क यांच्याकडे टेस्लाचा १३ टक्के हिस्सा आहे. भागधारकाच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, कंपनीने एलन यांच्या पॅकेजवर निर्णय घेण्यापूर्वी खोटी वाटाघाटी केली. यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने कोणत्याही भागधारकाचा सल्ला घेतला नाही. टेस्लाने भागधारकांची दिशाभूल केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर एलन मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून अनेक पोस्ट केल्या. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘डेलावेअर राज्यात कधीही तुमची कंपनी बनवू नका.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top