महाड दुर्घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आमदार अनिकेत तटकरेंची मागणी

रायगड – रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या ब्ल्यूजेट केमिकल कंपनीमध्ये शक्रवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनी व्यवस्थापन व संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात शासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी केली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना भरघोस आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणीही तटकरे यांनी केली. दुर्घटनेनंतर काल आमदार तटकरे यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत कंपनीला भेट देऊन तेथे उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रायगडच्या इतिहासात अशी भीषण दुर्घटना भविष्यात कधीही घडू नये. याच पार्श्वभूमीवर शासनाने या संदर्भात अत्यंत कठोरपणे संबंधितांच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top