मांजामुळे गळा कापल्याने लष्करी जवानाचा मृत्यू

हैदराबाद
चिनी मांजाने गळा कापला गेल्याने कोटेश्वर रेड्डी या 30 वर्षीय लष्करी जवानाचा मृत्यू झाला. तो ड्युटी संपवून दुचाकीवरुन परतत होता. त्यावेळी त्यांच्या गळ्याजवळ चिनी मांजा अडकल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो दुचाकीवरुन खाली पडला. मांजामुळे गळा कापला गेल्याने बराच रक्तस्राव झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कोटेश्वर रेड्डी कोटेश्वर विशाखापट्टणममध्ये लंगर हाऊस परिसरातील बापू नगर भागात ते पत्नीसह वास्तव्यास होते. लष्करी रुग्णालयात ते चालक म्हणून कार्यरत होते. कोटेश्वर यांचे पार्थिव आंध्र प्रदेशमधील त्यांच्या घरी पाठवण्यात यावे, अशी विनंती त्यांच्या पत्नीने केली होती. उस्मानिया रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 304 च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top