माजी न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांना तामलुकमधून भाजपाची उमेदवारी

कोलकता
कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ५ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांनी तामलुक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपने काल लोकसभा निवडणुकीसाठी १११ उमेदवारांची घोषणा केली. त्यात गंगोपाध्याय यांच्या नावाचाही समावेश होता. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा प्रभाव असणारा तामलुक मतदारसंघ मानला जातो. २००९ च्या निवडणुकांपासून या मतदारसंघावर तृणमूलचे वर्चस्व आहे.
भाजपामध्ये प्रवेश करताना अभिजीत गंगोपाध्याय म्हणाले होते की, “मला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पाडले गेले. सत्ताधारी पक्षाकडून वारंवार मारल्या जाणाऱ्या टोमण्यांमुळे मी हा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाने अनेक वेळा माझा अवमान केला. त्यांच्या प्रवक्त्यांनी असांसदीय शब्द उच्चारून माझ्यावर हल्ला केला आहे. मला वाटते की, त्यांचे शिक्षण कमी असल्यामुळेच ते अशी वक्तव्य करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top