मालदीवचे राष्ट्राध्यक्ष चीनला ३० बेटांवरील कंत्राट देणार

माले- मालदीवच्या संसदीय निवडणुकीत भारतविरोधी राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांना बहुमत मिळाल्यानंतर आता ते राज्यघटना बदलण्याच्या मार्गावर दिसत आहेत.कारण ते आता मालदीवच्या ३० बेटांवर चिनी आस्थापनांना बांधकामासाठी कंत्राटे देणार आहेत.त्याठिकाणी चिनी आस्थापने पहिल्या टप्प्यात एक हजार सदनिका बांधणार आहेत.

मालदीवमध्ये समुद्रावर पूल बांधून ही ३० नवीन बेटे निर्माण करण्यात आली आहेत.मालदीवचे माजी भारत समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद हे नवीन बेटांवर बांधकाम करण्याच्या विरोधात होते. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे मालदीव हा जगातील पहिले पर्यावरण निर्वासित देश होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला होता.मालदीववर ५४ हजार १८६ कोटी रुपयांचे विदेशी कर्ज आहे.जागतिक बँकेनुसार २०२६ पर्यंत मालदीवला अंदाजे ९ हजार कोटी रुपयांचे विदेशी कर्ज फेडावे लागणार आहे. यासाठी अध्यक्ष मुइज्जू यांनी इस्लामी रोख्यांद्वारे ४ हजार २०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्याकडून इस्लामी रोखे खरेदी केले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top