मासिक पाळीत विद्यार्थिनींना सुट्टी मिळणार पंजाब विद्यापिठाचा महत्वाचा निर्णय

चंदीगड

मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या लक्षात घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाने हा नवा नियम शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी लागू केला आहे. पंजाब राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब विद्यापीठाने याबाबतची माहिती देणारे परिपत्रक जारी केले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मासिक पाळीदरम्यान सु्ट्टी जाहीर करताना त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत.

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाच्या कुलगुरूंनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आगामी शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून विद्यार्थिनींना अटी आणि शर्तींसह मासिक पाळीदरम्यान रजा दिली जाईल. पण ही रजा फक्त एक दिवसासाठी देण्यात येणार आहे. मासिक पाळीसाठी रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात उपलब्ध अर्ज भरावा लागेल. हा अर्ज देणाऱ्या विद्यार्थीनीलाच रजेची परवानगी मिळेल. एक विद्यार्थीनी मासिक पाळीसाठी एका महिन्यात एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकते. संबंधित विद्यार्थ्यीनीची वर्गात किमान १५ दिवस उपस्थिती असल्यास तिलाच ही सुट्टी दिली जाईल.
नियमानुसार प्रत्येक सत्रात चार दिवस सुट्टी दिली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top