मुंबई,गुजरातच्या समुद्रात हेरगिरी छोट्या चिनी नौकांचा वावर वाढला

मुंबई – मुंबई आणि गुजरातच्या किरापट्टीजवळ अरबी समुद्रामध्ये छोट्या चिनी नौकांचा वावर वाढल्याचे आढळून आले आहे.एका उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्राद्वारे ही बाब स्पष्ट झाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी याबाबत सतर्कता बाळगण्याचा इशारा भारतीय गुप्तचर विभागाने दिला आहे.या चिनी नौका भारतीय पाणबुड्यांची जागा आणि बंदराची माहिती घेत असल्याचा संशय आहे.

‘मिनी स्पाय शीप’ म्हणून या छोट्या चिनी नौकांची संख्या दुप्पट झाली आहे.या छोट्या शेकडो नौका पाणबुडीच्या स्थानापासून गुप्त पाइपलाइन आणि भारतीय बंदरांवरील हालचालींबाबतची कोणतीही गुप्त माहिती गोळा करू शकतात, असे गुप्तचरांनी म्हटले आहे. ‘बहुतेक चिनी जहाजे भारताचे सध्याचे इस्वायत्त आर्थिक क्षेत्र जेथे संपते तेथे २०० सागरी मैलांच्या बाहेर आहेत,’असे भारतीय नौदल संरक्षण सल्लागार गटातील वरिष्ठ नौदल कमांडरने म्हटले आहे.

दक्षिण चीन समुद्रातील ग्रे झोनमध्ये ज्याप्रमाणेच चीनने पुढे जाण्याची चिन्हे दिसायला लागल्यावर त्यांना रोखण्यासाठी अनेक आघाडीच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत.त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने भारताचे वर्चस्व असलेल्या पाण्यात चिनी जहाजांच्या अचानक येण्यावर बारकाईने नजर ठेवून आहेत.चीनच्या या नौकांमध्ये अमेरिकेने निर्बंध घातलेल्या नौका आहेत, असे सागरी तज्ज्ञांनी म्हटले आहे.भारताच्या स्वायत्त आर्थिक क्षेत्राचा विस्तार करण्यात यावा,अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीपासून २०० सागरी मैलांची हद्द ५०० सागरी मैलांपर्यंत वाढवण्याची भारताची मागणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top