मुंबईत कबुतरांना चणे टाकल्यास आता ५०० रुपये दंड आकारणार

मुंबई – कबुतरांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी आता कबुतराला चणे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या क्लीन अप मार्शलची त्यावर बारीक नजर राहणार आहे.यापुढे कबुतरांना चणे टाकताना कुणी आढळल्यास १०० ते ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे,अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई शहरातील दादर, माहीम,फोर्ट,माटुंगा अशा प्रसिद्ध ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत.तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरातही अनेक ठिकाणी काही बेकायदेशीर कबुतरखाने आहेत. याठिकाणी लोक कबुतरांना चणे,डाळ असे खाद्य टाकत असतात.मात्र या कबुतरामुळे बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन होतात. तसेच कबुतरांच्या विष्ठेतून त्वचेची अ‍ॅलर्जी,डोळे लाल होणे,श्वासनलिकेला सूज येणे,दमा,फुफ्फुसांना सूज येणे,अशा विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता कबुतरांना चणे खाद्य टाकणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात क्लिन अप मार्शलची गस्त असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top