मुंबईत ‘तेज’ चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता

मुंबई

अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हवेच्या दबामुळे मुंबईच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच येथे वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची होण्याची शक्यता आहे.

आग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या शेजारच्या लक्षद्वीप परिसरात चक्रीवादळाचा प्रभाव आहे. समुद्रसमाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव आहे. या प्रभावामुळे येत्या ३६ तासांमध्ये पूर्व-मध्य तसेच लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top