मुंबईमधील नालेसफाईसाठी ३१ कंत्राटदार! २५० कोटींचा खर्च

मुंबई- पावसाळ्यात येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने नालेसफाईला सुरुवात केली आहे. शहर, उपनगरात छोट्या-मोठ्या नाल्यांतील तसेच द्रुतगती महामार्गालगतचे नाले, मिठी नदीतील गाळ उपसा करण्याची जबाबदारी पालिकेने ३१ कंत्राटदारांवर सोपवली आहे. यासाठी पालिका २४९.२७ कोटी खर्च करणार आहे.
मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेकवेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी, गाळ वाहून नेला जातो, मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांचे पाणी शहरात घुसते. त्यामुळे पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला होणारी नालेसफाई यंदा उशिराने सुरू झाल्याने कंत्राटदारांना ३१ मे पूर्वी १० लाख २२ हजार १३१ मेट्रिक टन गाळ काढावा लागणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचे ५० हजारांहून अधिक मनुष्यबळ जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार आहे. देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top