मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रथमच उभारले धनकुबेर मंदिर

डहाणू – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पहिल्यांदाच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर श्री धनकुबेर यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अंबाधाम आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतीच मोठ्या उत्साहात करण्यात आली.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ वाडा खडकोना येथे गोमातेश्वर अंबाधाम आश्रम परिसरात ही धनकुबेर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांच्या मूर्तींचीदेखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
ठाणे, पालघर, रायगड तसेच गुजरातजवळच्या जिल्ह्यात धन कुबेर यांचे मंदिर नसल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावर भाविकांना दर्शन घेण्यासाठी धनकुबरे यांचे मंदिर असावे अशी भाविकांची मागणी होती. त्यामुळे ही मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माजी आमदार आनंद ठाकूर,आमदार अमित घोडा, डॉ.ओमप्रकाश दुबे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top