मुंबई, पुण्यातील हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर

मुंबई

मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदुषणात वाढ झाली असून हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर गेला आहे. आज मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११३ वर, तर पुण्याचा हवा १६३ होता. तर पुण्यातील लोहगावमधील हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल २९७ वर गेला आहे. पुण्यात पीएम २.५ कणांची मात्रा, तर मुंबईत पीएम १० कणांची मात्रा अधिक असल्याची नोंद झाली. अंधेरीतील एक्यूआय ३५१ वर गेला आहे. दिल्लीचा आजचा निर्देशांक ८३ होता. त्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या हवेचा दर्जा दिल्लीपेक्षाही खालावला आहे. हिवाळ्याच्या काळात हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सातत्याने धोकादायक पातळीवर जात आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top