मुंबई विमानतळ आज सहा तासांसाठी बंद

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) उद्या ६ तासांसाठी बंद राहणार आहे. या सहा तासांत मुंबई विमानतळावरून कोणतेही उड्डाण होणार नाही. मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या उद्या सकाळी ११ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद असतील. या दरम्यान विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती विमानतळ ऑपरेटर यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यात येतील. या संबंधीत नोटीस सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे, अशी महिती अधिकार्‍यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top