‘मुक्यां’च्या गावातील तीन मूकबधिर बहिणींनी पहिल्यांदाच मतदान केले

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीर सायलेंट व्हिलेज अशी ओळख असलेल्या मुकबधिरांच्या गावातील तीन बहिणी आज पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
सायरा खातून (२०), परवीन कौसर (२२) आणि रेश्मा बानो (२४) अशी या तीन बहिणींची नावे आहे. यावर्षी पहिल्यांदाच त्यांची नावे मतदार यादीत नोंदवण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. सायलेंट व्हिलेज अशी ओळख असलेल्या दढकाई नावाच्या गावात त्या राहतात. मतदानाचा हक्क मिळाल्याने त्यांना कोण आनंद झाला. आज पहिल्या टप्प्यात उधमपूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये या तीन बहिणींनी मतदान करून योगदान दिले.
डोडा जिल्ह्यातील गंडोह परिसरात डोंगर माथ्यावर दढकाई हे गाव वसलेले आहे.गावात मोजून १०५ कुटुंबे राहतात. हे गाव रहस्यमय आहे. कारण गावातील १०५ कुटुंबांतील तब्बल ५५ कुटुंबे अशी आहेत की, ज्या कुटुंबातील किमान एक सदस्य बोलू-ऐकू शकत नाही. गावात मूक आणि कर्णबधीर असे एकूण ८४ लोक आहेत. त्यापैकी ४३ महिला आणि दहा वर्षांखालील चौदा मुले आहेत. हे असे का आहे याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top