मुलुंडच्या सायकल ट्रॅकवरील खड्डे बुजविण्यासाठी ४ कोटी खर्च करणार

मुंबई- मुलुंड परिसरात ‘हरितवारी जलतिरी’ प्रकल्पांतर्गत जलवाहिनीशेजारी बांधलेल्या सायकल ट्रॅकवर पाच वर्षांतच खड्डेच खड्डे पडले आहेत.याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यामुळे हे खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी तब्बल ३ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
२०१६-१७ मध्ये मुलुंड टी विभागातील मुख्य जलवाहिनीजवळ १.१४० किमी लांबीचा सायकल ट्रॅक म्हणून डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे.मात्र आता या सायकल ट्रॅकवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.नागरिकांना या रस्त्यावरुन फेरफटका मारतानाही त्रास होऊ लागला आहे.त्यामुळे अनेकानी पालिकेकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या.त्यामुळे पालिका प्रशासनाने या सायकल ट्रॅकवरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी मे.शंखेश्वर इंटरप्रायजेस कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी हे काम १२.६९ टक्के कमी दराने करणार आहे.यामध्ये पालिकेची ३८ लाख रूपयांची बचत होणार असल्याची माहिती पालिकेच्या प्रस्तावात दिली आहे.विशेष म्हणजे कंत्राटदाराकडून अंदाजित निविदा रकमेवर ४ लाख २० हजार इतकी अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम घेण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top