मोदींच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियात मोहीम सात शहरांतून भाजपाचा प्रचार सुरू

कॅनबेरा – ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ परदेशातील भाजपा समर्थकांनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांसाठी ‘मोदी फॉर २०२४’ नावाची मोहीम सुरू केली. ऑस्ट्रेलियातील सात प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणांचा या मोहिमेत समावेश आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) परदेशातून पाठिंबा मिळवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी ऑस्ट्रेलिया’ने सिडनी हार्बर ब्रिज, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, पर्थ ऑप्टस स्टेडियम, ब्रिस्बेन गॅबा, गोल्ड कोस्टमधील सर्फर्स पॅराडाईज, कॅनबेरामधील माउंट एन्सली आणि ॲडलेडमधील नेव्हल मेमोरियल गार्डन यांसारख्या ठिकाणांवरून एक मोठी मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी- ऑस्ट्रेलिया’च्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियातील विविध शहरांतील भाजपा समर्थकांनी स्वतःला ‘मोदी का परिवार’चा भाग म्हणून संबोधले. तसेच भाजपा सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील विकासात्मक धोरणांना पाठिंबा दर्शविला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top