मोदी ३० मार्चला मेरठमधून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये योणार आहे. मेरठमधून मोदी भाजपाच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात करणार आहेत. लोकसभा प्रचारासाठी मेरठमध्ये ३० मार्चला भाजापाच्या भव्य आणि पहिल्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपाच्या अनेक नेत्यांची उपस्थित असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ चे लक्ष्य ठेवले आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील मतदारसंघ अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीद्वारे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहे तर मायावतींचा बहुजन समाज पक्ष स्वतंत्र लढणार आहे. भाजपाने उत्तर प्रदेशातील ६४ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये रामायणात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल भाजपचे उमेदवार आहेत. पंतप्रधान मोदी मेरठ येथून एक मोठी रॅली काढून ३० मार्चला प्रचाराची सुरूवात करणार आहेत. यादरम्यान जयंत चौधरीही त्यांच्यासोबत असतील. भाजपाने दिलेले राम मंदिर निर्माणाचे आश्वासन पूर्ण केल्यानंतर भाजपाला उत्तर प्रदेशासह देशभरात मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top