मोहित पांडे अयोध्येतील राममंदिराचे पुजारी बनले!

अयोध्या – अयोध्येतील राममंदिराचे पुजारी म्हणून गाझियाबाद येथील विद्यार्थी मोहित पांडे यांची निवड झाली आहे.दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्षे अभ्यास केल्यानंतर पुजारी मोहित पांडे पुढच्या अभ्यासासाठी तिरुपतीला गेले होते.तीन हजार जणांच्या मुलाखतींनंतर रामंदिराचे पुजारी म्हणून ५० जणांची निवड करण्यात आली. त्यात मोहित पांडे यांचा समावेश आहे.
पुजारी नियुक्तीच्या पूर्वी मोहित पांडे यांना सहा महिने प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. गाझियाबाद येथे दुधेश्वरनाथ मंदिर आहे. हे उत्तर भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या परिसरात दुधेश्वर वेद विद्यापीठ आहे. येथे शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी येतात. दुधेश्वर वेद विद्यापीठात शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश-विदेशात पुजारी आणि आचार्य म्हणून सेवा देत आहेत. मोहित पांडे यांनी पहिले सामवेदाचा अभ्यास केला. नंतर व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठात जाऊन अभ्यास केला.मोहित यांनी दुधेश्वर विद्यापीठात सात वर्षे धर्म आणि कर्मकांडाचाही अभ्यास केला आहे.दुधेश्वर येथे मागील २३ वर्षांपासून वेदांचे शिक्षण दिले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top