म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस रेल्वेला कराडसह साताऱ्यातही थांबा

कराड- दक्षिण- पश्चिम रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या म्हैसूर -अजमेर साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वेला कराडसह साताऱ्यातही थांबा मंजूर केला आहे.रेल्वे प्रवाशी संघटनांनी त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

उन्हाळी सुट्टीच्या हंगामासाठी १३ एप्रिलपासून म्हैसूर -अजमेर साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली आहे.या गाडीला पश्चिम महाराष्ट्रात मिरज वगळता एकही थांबा नव्हता.त्यानंतर सांगलीला थांबा मिळाला.पण सातारा जिल्ह्यातील कराड आणि सातारा या दोन्ही महत्वाच्या ठिकाणी थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशी नाराज झाले होते.त्यांनी प्रवाशी संघटनांच्या माध्यमातून पुणे आणि मुंबई रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवले होते. त्याची दखल घेत अखेर या गाडीला कराड आणि सातारा या दोन्ही ठिकाणे थांबे सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top