युक्रेनने केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार २० जखमी

कीव
युक्रेनने रशियाच्या अधिकृत ताब्यात असलेल्या झापोरझिया भागातील टोकमाक शहरावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार झाले असून २० जण जखमी झाल्याची माहिती रशियाने दिली आहे. या हल्ल्यात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रशियाने हा भाग ताब्यात घेतल्या नंतर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. अर्थात यावर युक्रेनकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. झापोरझिया हा भाग युक्रेनचा होता. त्यातील काही भागावर रशियाने नियंत्रण मिळवले होते. रशियाने २०२२ पासून युक्रेनचा पूर्ण ताबा मिळवण्यासाठी युद्ध सुरु केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मध्यस्थीचे प्रयत्न व संयुक्त राष्ट्रसंघांच्या काही आर्थिक निर्बंधांनंतरही रशियाने युद्धबंदीला नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय मदतीमुळे युक्रेननेही हल्ले पुन्हा सुरु केले असले तरी त्याची माहिती केवळ रशियाच्याच अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top