येस बँक घोटाळ्यातील आरोपी धीरज वाधवानला अंतरिम जामीन

मुंबई – येस बँक घोटाळा आणि मनीलाँड्रीग प्रकरणी अटक करण्यात आलेला डीएचएफएलचा प्रवर्तक धीरज वाधवानला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिला आहे.वाधवानला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एम मोडक यांनी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम आठ आठवड्याचा जामीन मंजूर केला आहे. धीरज वाधवान याच्या तब्येतीच्या अनेक तक्रारी होत्या.त्याला पाठीचा त्रास होत असून खासगी रुग्णालयात उपचारासाठी जामीन देण्यात यावा, अशी मागणी धीरज वाधवान याने ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि अ‍ॅड.विजय अग्रवाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एम.मोडक यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी वाधवानच्या वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला असून आता आजारपणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करावा.मात्र यावेळी सरकारी वकील ए.एम.चिमलकर यांनी या जामीन अर्जाला विरोध केला.दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला.मात्र त्याने कोणत्याही वैद्यकीय कागदपत्रांच्या व्यतिरिक्त इतर कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नये अशी त्याला अट घातली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top