योगी आदित्यनाथांनी २५ दिवसांत ६७ हून अधिक रॅली, रोड शो केले

लखनऊ
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मागणी वाढली. त्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशात २५ दिवसांत ६७ हून अधिक रॅली, रोड शो आणि प्रबोधन परिषद घेतल्या.
भाजपाकडून मिळालेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत 6 राज्यांमध्येही भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी निवडणूक प्रचार केला. त्यांनी मथुरा येथे 27 मार्च रोजी भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्या प्रचारासाठी जाहीरसभा घेऊन आपला निवडणूक प्रवास सुरू केला होता, तर दुसऱ्या टप्प्यात हनुमान जयंतीच्या दिवशी ‘श्री राम’चा शेवटचा कार्यक्रम रोड शो होता. योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत महाराष्ट्र, जम्मू, उत्तराखंड, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमध्ये सभा घेतल्या होत्या. यापैकी छत्तीसगडमधील राजनांदगाव, महाराष्ट्रातील वर्धा, राजस्थानमधील जोधपूर, राजसमंद, चित्तौडगड आणि बारमेर या जागांवर शुक्रवारी निवडणूक होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top