रशियात पुतिन पुन्हा अध्यक्ष ८७ टक्के मतांनी विजयी

मॉस्को :

रशियामध्ये पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन सत्तेमध्ये आले आहेत. त्यांना तब्बल ८७ टक्के मते मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाल्याने सहा वर्षे आणखी ते सत्तेत राहतील. पुतिन यांच्याकडे गेल्या २५ वर्षांपासून रशियाची सूत्रे आहेत.

रशियाच्या निवडणुकीत पुतिन पुतिन यांचा ही विजय औपचारिकता होती. त्यांच्यासमोर कोणी तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. त्यांचे विरोधक एक तर परदेशात होते किंवा त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. पुतिन यांच्या हुकूमशाही विरोधात लोकांनी तीव्र आंदोलन केले होते. परंतु त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले. जगभरातील अनेक देशांनी याबद्दल पुतिन यांचा निषेध केला होता. पाश्चिमात्य मीडियानेदेखील रशियातील निवडणुका म्हणजे शुद्ध फसवणूक असे म्हटले होते. पण, पुतिन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top