राज्यपाल, न्यायाधीश यांच्यानंतर माजी हवाई दल प्रमुखही भाजपात

नवी दिल्ली- राज्यपाल, न्यायाधीश आणि आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भाजपात प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनेही उधळली. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या काळात ते हवाई दलाचे प्रमुख होते.

काही दिवसांपूर्वी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. तर कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.भदौरिया यांनी तब्बल ४० वर्षे लष्करात सेवा बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर कार्यक्रमातही त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्याबरोबर काल वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते वरप्रसाद राव वेलागापल्ली यांनीही भाजपात प्रवेश केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top