राणीची बाग रामनवमीला सुरूच ! गुरुवारी बंद राहणार

मुंबई – भायखळा पूर्व भागात असलेली राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय उद्या बुधवार १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या सार्वजनिक सुट्टी दिवशीही लोकांसाठी खुले राहणार आहे.तर दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवार १८ एप्रिल रोजी ही राणीची बाग बंद असणार आहे,असे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

वास्तविक दर बुधवारी साप्ताहिक सुट्टीसाठी हे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहाल बंद असते. मात्र नेमकी याच दिवशी रामनवमीची सार्वजनिक सुट्टी आहे.त्यामुळे पालिकेने यापुर्वी मंजूर केलेल्या ठरावानुसार बुधवार ऐवजी दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवार १८ एप्रिलला हे उद्यान बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top