रामनवमी निमित्त अयोध्येत प्रभू श्रीरामाला दिव्य अभिषेक

अयोध्या :

रामनवमीनिमित्त आज अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात प्रभू श्रीरामाला दिव्य अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता अभिजीत मुहूर्तावर ४ मिनिटांसाठी श्रीरामाला सूर्यतिलक करण्यात आला. अभिजित मुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला असून वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याच मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. या पार्श्वभूमीवर श्रीरामाला दिव्य अलंकारांनी सजवण्यात आले होते.

सूर्यतिलकासाठी अष्टधातूच्या २० पाईपपासून ६५ फूट लांबीची यंत्रणा तयार करण्यात आली होती. यामध्ये गर्भगृहातून श्रीरामाच्या मस्तकावर ४ लेन्स आणि ४ आरशांद्वारे सूर्यकिरण पाठवण्यात आले. आज पहाटे ३:३० वाजता मंदिराचे दरवाजे उघडले, सामान्य दिवशी ते सकाळी ६:३० वाजता उघडतात. मध्यरात्री वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडे होते. जगद्गुरू राघवाचार्य यांनी प्रभू श्रीरामाला ५१ कलशांनी अभिषेक घातला. रामजन्मभूमी संकुलात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रामपथ, भक्तीपथ आणि जन्मभूमी मार्गावर मोठी गर्दी होती. लाखो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top