अयोध्या :
श्रीराम मंदिरात श्री रामाच्या नव्या मूर्तीचे प्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत भक्तांची वर्दळ वाढली आहे. या भव्य अभिषेक सोहळ्यानंतर अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलातील अपूर्ण काम आता पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. १५ फेब्रुवारीपासून हे काम सुरु करण्यात येणार आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मंदिरातील बांधकाम काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. आता हे काम पूर्ण पूर्ववत होणार आहे. मंदिराच्या पश्चिमेला पुन्हा दोन टॉवर क्रेन उभारण्यात येणार आहेत. राम मंदिराचे विश्वस्त अनिल मिश्रा म्हणाले की, सध्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही दिवस बांधकामात गुंतलेली मशिन काढून टाकण्यात आली होती. आता ती पुन्हा येथे आणली जातील. एल अँड टीचे कामगारही परततील, त्यानंतरच कामाला वेग येईल.’