अयोध्या- २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये राम मंदिराच्या उभारणीत भूमिका बजावणाऱ्या काही मजुरांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.तसेच ज्या कारसेवकांनी कार सेवेच्या वेळी प्रत्येकी १०० रुपयांची देणगी दिली होती,त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिर कामाचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी हे २२ जानेवारी रोजी अयोध्येत येणार्या निमंत्रित मंदिर बांधकाम मजुरांना भेटण्याची शक्यता आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जाण्याआधी पंतप्रधान मोदी हे या मजुरांना भेटतील. याबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.