राम रहीमला पंजाब-हरियाणा हायकोर्टाडून मोठा दिलासा

चंदीगड – बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राम रहीम हा लैंगिक शोषण आणि महिला ननच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. राम रहीमविरोधात न्यायालयाने कथित आक्षेपार्ह टिप्पण्यांप्रकरणी दाखल कलेले तक्रारपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम सिंग याच्यावर संत कबीर दास आणि गुरु रविदास यांच्याशी संबंधित एका घटनेच्या संदर्भात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रारपत्र दाखल केले होते. याप्रकरणी राम रहीम याच्या वतीने १७ मार्च रोजी एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये सत्संगाबाबत नोंदवण्यात आलेल तक्रारपत्र रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते. न्यायालयाने आता याचिका निकाली काढली आहे. उच्च न्यायालयाने रद्द केलेले तक्रारपत्र सात वर्षे जुन्या सत्संगाबाबत नोंदवण्यात आले होते.

पाटण, जालंधर येथे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आयपीसी कलम २९५ ए अंतर्गत राम रहिमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ज्या सत्संगासाठी गुन्हा दाखल झाला, तो सत्संग सात वर्षांपूर्वी झाला होता. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तक्रार दाखल करण्यात आली, असे याचिकेच म्हटले. या खटल्यातील दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, प्रवचनाच्या वेळी कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला हानी पोहोचवल्याचा कोणताही पुरावा स्पष्टपणे आढळला नाही. त्यामुळे दाखल केलेले तक्रारपत्र रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top