रोहित पवारांच्या मातोश्री ही निवडणूक मैदानात उतरल्याबारामती

आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी बारामती मतदारसंघातील उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे सुनंदा पवार बारामतीतून लोकसभा लढणार का, अशा चर्चा सुरु होती . बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गटासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बारामतीतून अजित पवार गटाने सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या ठिकाणी कोणाताही दगाफटका होऊ नये, यासाठी सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच आता सुनंदा पवार देखील बारामतीतून डमी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामतीत दोन्ही गटाकडून डमी अर्ज घेतल्याने याठिकाणी मतदारसंघात नवा ट्विस्ट येणार का, अशा चर्चा सुरु आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top