लंडनमध्ये राजनाथ सिंह यांनी ऋषी सुनक यांची भेट घेतली

लंडन
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लंडनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीत दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत करणे, संरक्षण, मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीबाबत आणि प्रादेशिक मुद्द्यावर सखोल चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्ट करत या भेटीचे फोटो देखील शेअर केले. या भेटीत राजनाथ सिंह यांनी सुनक यांना रामाची मूर्ती भेट दिली.
राजनाथ सिंग पोस्टमध्ये म्हणाले की, ‘आम्ही संरक्षण आर्थिक सहकार्य, भारत आणि ब्रिटन नियम-आधारित व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकत्र कसे कार्य करू शकतात, यावर चर्चा केली. 2020 मध्ये भारतात आणि चीन आमनेसामने आले आणि आमच्या सुरक्षा दलांनी दाखवलेले शौर्य हेच कदाचित चीनचा भारताबद्दल द्वष्टिकोन बदलण्यास कारण ठरले आहे. भारत आता कमजोर राहिलेला नाही. याची जाणीव त्यांना झाली आहे. पूर्वी आम्ही संरक्षण सामग्रीचे सर्वात मोठे आयातदार होतो. परंतु आता संरक्षण सामग्रीच्या निर्यातीच्या बाबतीत आम्ही पहिल्या 25 देशांत आहोत.` सध्या राजनाथ सिंग ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर भारतीय संरक्षण मंत्री प्रथमच ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top