लकेंचा आमदारकीचा राजीनामा! विखेंविरुद्ध निवडणूक लढवणार

अहमदनगर – अजित पवार गटातून शरद पवार गटाकडे गेलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. ते आता दक्षिण अहमद नगर मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. आज लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. याच मेळाव्यात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तसेच दक्षिण नगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते शरद पवार गटाचे उमेदवार असतील.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आज त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. प्रशासनातील काही लोक केवळ माझ्या जवळचे होते, म्हणून महसूल विभागातील ४७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आपल्या कामाला निधी मिळाला, तर अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला. आजची वेळ निर्णय घेण्याची वेळ आहे. शेपूट घालून बसणारी औलाद आमची नाही. माझ्यावर वारंवार वार करण्याचा प्रयत्न केला. पण मी घाबरणारा नाही . यंदाची निवडणूक आपल्याला २ लाख मतांनी जिंकायची आहे. त्यासाठी कामाला लागा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. लंकेंच्या उमेदवारीमुळे दक्षिण नगर मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top