लडाखमधील वांगचुक यांचे २१ दिवसीय आंदोलन संपले

लेह

लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २१ वा दिवस होता. वांगचुक यांनी सांगितल्याप्रमाणे ते लेह शहरातील नवांग दोरजे मेमोरियल पार्क येथे कडाक्याच्या थंडीमध्ये ६ मार्चपासून २१ दिवस उपोषण करणार होते. आज संध्याकाळी त्यांचे २१ दिवसीय उपोषण संपले. वांगचुक प्रत्येकी २१ दिवसांच्या टप्प्याने उपोषण करणार आहेत. त्यांच्या पहिले २१ दिवसीय उपोषण ६ मार्चला सुरूझाले होते. या उपोषणादरम्यान त्यांच्या मागणीला सरकारने कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही.

सरकार जोपर्यंत लडाखमधील लोकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोर्यंत वांगचुक प्रत्येकी २१ दिवसांच्या टप्प्याने उपोषण करणार आहेत. सोनम वांगचुक यांनी सांगितले की, ६ मार्चपासून लडाखमध्ये सुमारे ६० हजार लोक उपोषणाला बसले होते. मात्र या उपोषणाची सरकारने अद्यापि दखल घेतली नाही. जोपर्यंत सरकर आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत लडाखमध्ये हे आंदोलन सुरुच राहिल.

कडाक्याची थंडी आणि उपोषण यांमुळे वांगचूक यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र वांगचूक यांच्या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. लडाखमध्ये लेह आणि कारगीलसाठी दोन स्वतंत्र खासदारांची तरतूद करण्यात यावी. राज्यघटनेचे सहावे परिशिष्ठ लागू करावे आणि लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना व्हावी, अशा अनेक मागण्यांसाठी वांगचूकर यांनी उपोषम केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top