ललित पाटील अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे – अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे. ललितसोबतच शिवाजी शिंदे आणि चौधरी या आरोपींचा ताबाही पुणे पोलिसांनी घेतला आहे. पुणे पोलिसांनी आर्थर रोड जेलमधून ललितला ताब्यात घेतले. ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी इतर अटक केली आहे. पण या प्रकरणातील पुढील चौकशीसाठी पुणे पोलिसांना ललितचा ताबा मिळणे गरजेचे होते. त्यामुळे ललितचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते. आता अखेर न्यायालयाने त्याची परवानगी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top