लेह-मनाली राष्ट्रीय महामार्ग पाच महिन्यांनी खुला झाला

लेह – थंडीच्या काळात भारी बर्फवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आलेला लेह-मनाली राष्ट्रीय महागार्ग तब्बल पाच महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमधून जाणारा हा पर्यायी महामार्ग लडाखला देशाशी जोडणारा दुवा आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने या मार्गावर जागोजागी बर्फ साचला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आता रस्त्यावरील बर्फ पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top