लेह-लडाख,काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

लेह- लेह-लडाखमध्ये आज पहाटे ४.३३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपात कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झाली नाही. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागातही काल रात्री १.१० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. यातही कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top