लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात आग

मुंबई
लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावरील जनआहार कॅन्टिनमध्ये आज दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास आग लागली. आग मोठ्या स्वरुपात होती, मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा स्टॉल होता. या फलाटावर त्यावेळी कोणतीही गाडी नव्हती, त्यामुळे गर्दी कमी होती. रेल्वे प्रशासनाने हा फलाट तत्काळ रिकामी केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top