लोकलनंतर थेट मेट्रो गाठता येणार सीएसएमटी-मेट्रो ३ जोडण्याचा प्रस्ताव

मुंबई- मुंबईकरांना पुढील काही वर्षात लोकलमधून उतरून पुढील प्रवासासाठी मेट्रो ट्रेन पकडता येणार आहे.कारण सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि मेट्रो-३ स्टेशन एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव आहे.या प्रस्तावावर सध्या राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे.

मेट्रो-३ सुरू झाल्यानंतर सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनमधून बाहेर पडणारा प्रवाशांचा लोंढा मेट्रो-३ वर येणार आहे. तसेच मेट्रो प्रवासानंतर लोकल पकडायची असेल सीएसएमटी स्टेशनवरही गर्दी होणार असेल.या दोन्ही स्थानकातील प्रवाशांना वापरासाठी सध्याचा पालिकेचा भुयारी मार्ग आहेच.मात्र मेट्रो सुरू झाल्यावर भुयारी मार्गात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे सीएसएमटी मेट्रो स्टेशन ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक पर्यंत नवीन भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव आहे. हा नवीन भुयारी मार्ग हिमालय पुलाजवळ असणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने हा प्रस्ताव रेल्वेला सादर केला आहे.नवीन मार्गामुळे सध्याच्या भुयारी मार्गातील संभाव्य प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top